• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 4, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
चार्जिंगदरम्यान इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटरला भीषण आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ जुलै २०२६

शहरातील शिव कॉलनी परिसरातील गुंजन अपार्टमेंटच्या तळमजल्यावर असलेल्या ‘परिवर्तन इलेक्ट्रिक बाईक सर्व्हिसिंग सेंटर’ या दुकानाला शुक्रवारी (दि. ३ जुलै) दुपारच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरीचे चार्जिंग सुरू असताना आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे अवघ्या २० मिनिटांत आग पूर्णपणे नियंत्रणात आली. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुकानातून मोठ्या प्रमाणात धूर आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आगीने काही क्षणांतच दुकानातील इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटऱ्या तसेच सर्व्हिसिंगसाठी लागणारे साहित्य आपल्या विळख्यात घेतले. दुकानाचे मालक निखिल संजय जाधव असून, संबंधित इमारतीच्या मालक संगीता पाटील आहेत. आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणावर साहित्य जळून खाक झाले असून नेमक्या नुकसानीचा अंदाज अद्याप घेतला जात आहे.

आग तळमजल्यावरील दुकानात लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यांवर राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः घरांमध्ये असलेले एलपीजी गॅस सिलिंडर धोकादायक ठरू शकत असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रसंगावधान राखत ते तातडीने सुरक्षित स्थळी हलविले. या वेळी परिसरातील नागरिकांनाही सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. त्यामुळे संभाव्य स्फोट किंवा जीवितहानीचा मोठा धोका टळला.

लिथियम-आयन बॅटरीमुळे आग अधिक भडकत असल्याने सुरुवातीला अग्निशमन दलाने पाण्याचा फवारा मारून तापमान कमी केले. त्यानंतर विशेष फोमचा वापर करून आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात आले. दोन अग्निशमन बंबांच्या सहाय्याने सुमारे २० मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे विझविण्यात यश आले.

मुख्य अग्निशमन अधिकारी अश्वजीत घरडे आणि उपअग्निशमन अधिकारी भारत बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाहनचालक देविदास सुरवाडे, प्रभाकर पाटील, गोविंद सोनवणे तसेच फायरमन रोहिदास चौधरी, तेजस जोशी, रजनीश भावसार, सत्तार तडवी, सुमित साबळे, यश मनोरे, नवल शंकरपाळ, ललित पाटील, दीपक रांधडे, रितेश उबाळे, वृषभ सुरवाडे आणि रवींद्र सपकाळे यांनी धाडसीपणे आग विझविण्याचे काम केले.

घटनेनंतर परिसरात काही काळ नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, दुकानातील साहित्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण आणि नुकसानाचा तपशील संबंधित यंत्रणांकडून तपासला जात असून, प्राथमिक माहितीनुसार इलेक्ट्रिक स्कूटरच्या लिथियम-आयन बॅटरीचे चार्जिंग सुरू असताना आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Related Posts

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !
क्राईम

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू
क्राईम

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

अल्पवयीन मुलीस पळवून नेत अत्याचार : एक अटकेत !

July 4, 2026
वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !
जळगाव

वीज देखभाल दुरुस्तीचा फटका; जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस उशिराने !

July 4, 2026
पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !
जळगाव

पहाटे एलसीबीची दुहेरी धडक; बेकायदेशीर गोवंश कत्तल प्रकरणाचा पर्दाफाश, ११ जण ताब्यात : ३ बैलांची सुटका !

July 3, 2026
बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

बालरंगभूमी परिषद जळगाव व मुक्ती फाऊंडेशनतर्फे विनामुल्य आरोग्य तपासणी शिबिर !

July 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का? खान्देशातील महिला उपनेत्या शिंदे गटाच्या वाटेवर !

July 4, 2026
दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

दोन एसटींची समोरासमोर भीषण धडक; २५ विद्यार्थ्यांसह ३० प्रवासी जखमी !

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

संत सखाराम महाराज संस्थानच्या पुनर्बांधणीसाठी शासन खंबीर; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची ग्वाही

July 4, 2026
ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

ट्रक रिव्हर्स घेताना मागे बसलेल्या वृद्धाचा चाकाखाली चिरडून मृत्यू

July 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group