जळगाव मिरर | १२ जुलै २०२६
बोलण्यात गुंतवून ठेवत हातचालाखी करीत एटीएम कार्ड बदलवून पुरुषोत्तम वसंत तळेले (वय ५४, रा. भुसावळ) या ग्रामसेवकाला ८० हजारात गंडविले. ही घटना दि. १० जुलै रोजी शहरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुख्य शाखेजवळील एटीएम केंद्रात घडली. या प्रकरणी अनोळखी तरुणाविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतमध्ये नियुक्तीस असलेल्या ग्रामसेवक असलेले पुरुषोत्तम तळेले हे त्यांच्या पत्नीला घेऊन जळगावातील एका रुग्णालयात आले होते. उपचारासाठी ते एटीएम केंद्रात पैसे काढण्यासाठी गेले, परंतू पैसे निघत नव्हते. त्या वेळी त्यांच्या मागे उभ्या असलेल्या अंदाजे २५ ते ३० वर्षीय अनोळखी तरुणाने ‘तुमच्या खात्यात बॅलेन्स नसेल’ असे म्हणत त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि त्यांच्याजवळ असलेल्या एटीएम कार्डची हातचालाखी करीत अदलाबदल केले. परंतू एटीएममधून पैसे न निघाल्याने तळेले रुग्णालायात निघून गेले. त्यानंतर त्यांच्या खात्यातून आठ वेळा प्रत्येकी १० हजार रुपये असे एकूण ८० हजार रुपये कमी झाल्याचे दिसले. एटीएम केंद्रात हाताचालाखी करीत परस्पर एटीएम कार्ड बदलावन पैसे काढून फसवणुक के ल्याप्रकरणी पुरुषोत्तम तळेले यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक सुवर्णा तायडे करीत आहेत.




















