जळगाव मिरर | १३ जुलै २०२६
भुसावळ शहरातील गणेश कॉलनी, जळगाव रोड परिसरात राहणाऱ्या एका रिक्षा चालकाने आत्महत्या केल्याची घटना काल उघडकीस आले आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. विनोद पंडित बाविस्कर (वय ५८) असे आत्महत्या करणाऱ्या रिक्षाचालकाने नाव आहे. या घटनेने परिवाराला मोठा धक्का बसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद बाविस्कर यांनी राहत्या घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. कुटुंबीयांनी त्यांना घरातील खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर ही घटना समजली. त्यांनतर पोलिसांना कल्पना देण्यात आली. पोलिसांनी प्राथमिक तपास करून या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २७/२०२६ अन्वये नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते काही काळापासून वैयक्तिक अडचणींमुळे मानसिक तणावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली
असून, आत्महत्येचे नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार हर्षा चौधरी करीत आहेत




















