• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 14, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४  जुलै २०२६ 

यावल तालुक्यातील किनगाव येथे मानवतेला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या प्रकरणाने पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर खुनाचे गंभीर स्वरूप धारण केले. साडेतीन वर्षांच्या अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार मारल्याचा, तसेच त्याच्या आईलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पती आणि सासूवर करण्यात आला असून, याप्रकरणी यावल पोलिसांनी खुनासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ जुलै रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किनगाव शिवारातील शेतातील विहिरीत सरस्वती स्वप्निल पाटील (वय २७) या ७० टक्के दृष्टिहीन महिलेसह तिचा साडेतीन वर्षीय मुलगा कृष्णा पडल्याची घटना घडली होती. या घटनेत सरस्वती या गंभीर जखमी झाल्या, तर कृष्णाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती.

जखमी सरस्वती यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रारंभी त्यांनी ही घटना अपघाती असल्याचे सांगितल्याने पोलिसांनाही तसा संशय नव्हता. मात्र, घटनेतील काही बाबी संशयास्पद वाटल्याने आणि मुलाचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत त्यांची सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक माहिती दिली.

सरस्वती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घटना घडली त्या दिवशी त्या, त्यांचे पती स्वप्निल भागवत पाटील (वय ३४) आणि सासू आशाबाई भागवत पाटील हे शेतातील विहिरीची पूजा करण्यासाठी गेले होते. याचवेळी सासूने त्यांना आणि त्यांच्या मुलाला विहिरीत ढकलून दिले. या कृत्यात पतीचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला आहे. विहिरीत पडल्यावर सरस्वती यांनी विहिरीतील लाकडी फाउंडेशनचा आधार घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, त्यांचा साडेतीन वर्षांचा मुलगा कृष्णा पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सरस्वती या ७० टक्के दृष्टिहीन असून त्यांचे पती स्वप्निल हे शंभर टक्के दृष्टिहीन आहेत. जन्मलेला मुलगा कृष्णाही दृष्टिहीन होता. डॉक्टरांनी गर्भावस्थेदरम्यान बाळही दृष्टिहीन असण्याची शक्यता सांगितल्यानंतर पतीने गर्भपात करण्याचा आग्रह धरला होता. मात्र, सरस्वती यांनी गर्भपातास नकार देत मुलाला जन्म दिला. त्यानंतर या कारणावरून पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत होते. या वादामुळे सरस्वती या जवळपास अडीच वर्षे माहेरी राहत होत्या, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २५४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१) आणि ३(५) अंतर्गत खुनाचा आणि खून करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी पती स्वप्निल पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण यावल तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, सुरुवातीला अपघात वाटणाऱ्या या प्रकरणामागील धक्कादायक सत्य समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group