जळगाव मिरर | १५ जुलै २०२६
येवला ते नांदगाव मार्गावरील सोमठाणे घाटात मंगळवारी पहाटे मध्य प्रदेशातील एका खासगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावर उलटली. या अपघातात तालुक्यातील मेहूणबारे येथील वेदांत देविदास येवले (वय २३) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील ही खासगी लक्झरी बस सुमारे २५ ते ३० प्रवाशांना घेऊन जात होती. तर, मंगळवारी पहाटे सोमठाणे घाटातून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस थेट रस्त्यावर उलटली. या अपघातात तालुक्यातील मेहूणबारे येथील वेदांत देविदास येवले (वय २३) या युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर २५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी ५ ते ६ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. दरम्यान, या अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि मदतीसाठी आरडाओरड सुरू झाली. तर, अपघातामुळे झालेला मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर जखमींना रुग्णवाहिकांच्या मदतीने नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, हा अपघात इतका भीषण होता की, उलटलेली बस रस्त्याच्या मधोमध आडवी झाल्याने येवला ते नांदगाव मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. तर, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करत आहेत. मृत वेदांत देविदास येवले हे मेहूणबारे येथील रहिवासी असून ते संदेश येवले येवले यांचे पुतणे असल्याची माहिती मिळाली आहे.


















