• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बहिणीकडे जाण्याचा प्रवास ठरला अखेरचा; धावत्या रेल्वेतून पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 22, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
सुरत रेल्वे गेटवर वयोवृद्धाचा रेल्वेच्या धक्क्याने मृत्यु
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २२ जुलै २०२६ 

नाशिक येथे बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बोरणार गावाजवळ उघडकीस आली. ललित भिकन सोनवणे (वय ३३, रा. तुकारामवाडी, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव असून, पोलिसांनी त्याच्या फुटलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकून त्याची ओळख पटविल्याने या तपासाची सर्वत्र चर्चा होत आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललित सोनवणे हा जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात वास्तव्यास होता. तो पेंटरचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. १९ जुलै रोजी रात्री तो नाशिक येथे राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी रेल्वेने निघाला होता. मात्र, प्रवासादरम्यान शहरापासून काही अंतरावर असलेल्या बोरणार गावाजवळील रेल्वे खांबा क्रमांक ३९६/२० ते ३९६/२२ दरम्यान अज्ञात कारणाने तो धावत्या रेल्वेतून खाली पडला. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.  दुसऱ्या दिवशी, २० जुलै रोजी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गाची पाहणी करणारे गँगमन गणेश भंगाळे हे त्या मार्गाने जात असताना रेल्वे रुळालगत एका व्यक्तीचा मृतदेह पडलेला दिसला. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलिसांना याची माहिती दिली.

माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अंमलदार पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील आणि कैलास पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र आढळले नाही. मात्र, घटनास्थळी फुटलेला मोबाईल मिळून आला.

तपासात महत्त्वाची भूमिका बजावत पोलिसांनी फुटलेल्या मोबाईलमधील सिमकार्ड काढून ते दुसऱ्या मोबाईलमध्ये टाकले. त्यामधील संपर्क क्रमांकांवर फोन करून नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी मयताचे मावसभाऊ उमेश वानखेडे यांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची ओळख ललित भिकन सोनवणे अशी पटवून दिली.  ओळख पटवल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. प्राथमिक तपासानुसार धावत्या रेल्वेतून पडल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, नेमका अपघात कसा घडला याचा तपास सुरू आहे.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेमुळे सोनवणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !
जळगाव

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना
जळगाव

पिंप्राळ्यात बैलपोळ्यानिमित्त शेतकऱ्यांची वरुणराजाकडे प्रार्थना

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

असंख्य भाविकांनी घेतली परम पवित्र भव्य महारुद्र पूजा पूर्णाहुतीची अनुभूती !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group