• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 24, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जमिनीच्या वादातून पुतण्याकडून काकाचा खून; अपघाताचा बनाव रावेर पोलिसांनी उधळला !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २४ जुलै २०२६

रावेर तालुक्यातील गारखेडा येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या पुतण्याने डोक्यावर काठीने वार करून काकाचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. खुनानंतर अपघात झाल्याचा बनाव करीत मयत काकाचा मृतदेह नाल्याजवळ कडेला टाकल्याची घटना रावेर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपासातून उघडकीस आणली आहे. या प्रकरणी आरोपीस अवघ्या काही तासांत पुतण्या अनिल जखा बारेला रा गारखेडा याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.०० वाजण्याच्या सुमारास पाल पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील गारखेडा येथे रामा थावरू बारेला (वय ४६) यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याची माहिती रावेर पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान मृताच्या डोक्याच्या उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी तपास चक्रे फिरवली. घटनास्थळावरील भौतिक पुरावे, तांत्रिक माहिती, स्थानिक चौकशी तसेच प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळवली. तपासादरम्यान असे निष्पन्न झाले.

की, मयताचा सख्खा पुतण्या अनिल जखा बारेला (वय २९) रा. गारखेडा याचे मयतासोबत जमिनीच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद सुरू होते. याच वादाच्या रागातून दि. २१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता आरोपीने घराजवळ लाकडी काठीने काकाच्या डोक्यावर जोरदार वार केला. या गंभीर मारहाणीत रामा थावरू बारेला यांचा जागीच मृत्यू झाला. अटकेची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील उपनिरीक्षक मनोज महाजन तसेच रावेर पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने पार पाडली. तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज महाजन करीत आहेत.

गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने आरोपीने मृतदेह सुमारे २० ते २५ मीटर अंतरापर्यंत ओढत नेऊन पायवाटेजवळील नाल्याच्या कडेला टाकून दिला, जेणेकरून हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा आभास निर्माण होईल. मात्र, रावेर पोलिसांनी अत्यंत बारकाईने, वैज्ञानिक पद्धतीने व कौशल्यपूर्ण तपास करून हा खुनाचा प्रकार उघडकीस आणला आहे. या प्रकरणी आरोपी अनिल जखा बारेला याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याबाबत पोलीस पाटील दिनेश नामदेव पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अनिल बारेला आज न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी मिळाली आहे.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !
जळगाव ग्रामीण

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोऱ्यातील दोघे सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी हद्दपार!

September 10, 2026
कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!
जळगाव

कर्जासाठी बेरोजगार तरुणांच्या बँकांच्या चकरा; मनसेचा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा!

September 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026
सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

सलग दुसऱ्यांदा खा.स्मिता वाघ यांना ‘संसद रत्न’ पुरस्कार !

September 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group