जळगाव मिरर | ११ ऑगस्ट २०२६
श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना, महाराष्ट्र राज्याच्या वतीनेआज जिल्हाधिकारी रोहनजी घुगे साहेब यांना निवेदन देण्यात आले स्व. धीरजभाऊ परदेशी यांची हत्या अत्यंत दुर्दैवी व संतापजनक घटना आहे. या घटनेमुळे संपूर्ण समाजामध्ये तीव्र दुख, संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

या प्रकरणातील आरोपींवर कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता निष्पक्ष व जलद तपास करून त्यांच्यावर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार फाशीची कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी आमची ठाम मागणी आहे. तरी या घटनेची गंभीर दखल घेऊन पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळावा आणि आरोपींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी तसेच स्व. धीरजभाऊ परदेशी यांच्या हत्येचा तपास निष्पक्ष व जलदगतीने करण्यात यावा.या केस मध्ये सन्माननीय उज्वलजी निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी.
सर्व आरोपींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.दोष सिद्ध झाल्यास आरोपींना कायद्यानुसार फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सक्षम कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात यावी.पीडित कुटुंबाला शासनाकडून योग्य ती आर्थिक व कायदेशीर मदत देण्यात यावी.पीडित कुटुंबाच्या सुरक्षिततेची आवश्यक ती काळजी घेण्यात यावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे प्रसंगी करणी सेनेचे कार्याध्यक्ष भगवान खंडाळकर, दामोदर राजपूत, जिल्हा अध्यक्ष विठ्ठलसिह मोरे, संदीप राणा, सारिका ताई पाटील, किरण राजपूत, कविताताई पाटील,जयश्री ताई पाटील आशिष राजपूत, अजय राजपूत,विकास राजपूत, अभिजित राजपूत, दिलीप पाटील आदी समाज बांधव उपस्थित होते




















