• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑक्टोंबर २०२६

गणपतीनगर परिसरातील बंद घराचे कुलूप तोडून रोख रक्कम, चांदी-सोन्याचे दागिने, मोबाईल, कपडे व कॉस्मेटिक साहित्य असा सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या दोन संशयितांना रामानंदनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यंत सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

गणपतीनगरातील गुरुनानक हौसिंग सोसायटी परिसरात तुषार गोविंदा गायकवाड यांचे घर आहे. दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास गायकवाड हे संपूर्ण कुटुंबासह घराला कुलूप लावून अजिंठा रोडवरील सुरभी लॉन येथे खाटूश्यामच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते दुसऱ्या दिवशी रात्री अडीचच्या सुमारास घरी परतले.

घरी आल्यानंतर त्यांना मुख्य दरवाजाचे कुलूप व कोंडा तुटलेल्या अवस्थेत दिसून आला. घरात प्रवेश करून पाहणी केली असता बेडरूममधील कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. कपाटातील ३९ हजार ५०० रुपये रोख, १० भार चांदी, ७ भारांचे चांदीचे ब्रेसलेट, ६ ग्रॅम सोन्याचे दागिने तसेच सुमारे ५० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, कपडे, कॉस्मेटिक साहित्य आदी असा एकूण सुमारे १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे समोर आले.

याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात सीसीटीएनएस गुन्हा क्रमांक २७३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांनी तपास अधिकारी व पथकाला घटनास्थळी जाऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी उपलब्ध फुटेज तसेच पूर्वीच्या गुन्ह्यांच्या नोंदी तपासून संशयितांचा माग काढण्यास सुरुवात केली.

तपासादरम्यान एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील समीर हनीफ काकर (रा. तांबापुरा) याच्यावर पोलिसांचा संशय बळावला. त्याच्यासोबत त्याचा साथीदार सचीन शंकर साळुंखे (रा. तांबापुरा) यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, समीर काकर याच्याविरुद्ध यापूर्वी १३ गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच तो नुकताच कारागृहातून बाहेर आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

दोघांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी न्यायालयातून पोलिस कोठडी मिळवून तपास केला. या तपासादरम्यान त्यांच्याकडून आतापर्यंत कॉस्मेटिक साहित्य, कपडे, बेंटेक्स साहित्य, चांदीचे जोडवे आणि ५ हजार रुपये रोख, असा सुमारे १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीतील उर्वरित मुद्देमालाबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.  कारवाईत सपोनि वारुंगसे, पोउपनि सचिन रणशेवरे, पोहेका जितेंद्र राजपूत, योगेश बारी, मनोज मराठे, सुमेध इंगळे आणि मुकुंद गवते यांनी सहभाग घेतला. पोलिसांकडून या घरफोडी प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात
क्राईम

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड
क्राईम

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!
क्राईम

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026
दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!
क्राईम

दीपनगरजवळ ट्रकचा भीषण अपघात; चालक जखमी, मोठा अनर्थ टळला!

October 1, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पेन्शन कार्डच्या आमिषाने प्रोफेसरची ऑनलाइन फसवणूक; खात्यातून ३ लाख ८५ हजार गायब

September 30, 2026
चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

चोरीचा भंगार खरेदी करणाऱ्या दुकानांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; 75 हजारांचा मुद्देमाल जप्त !

September 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

जळगावात बंद घर फोडून चोरी; सराईत गुन्हेगारांसह साथीदार पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

हिमाचलमधील खून करून जळगावात आले; मोबाईल विकण्याआधीच चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

October 1, 2026
‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

‘हेवन कॅफे’वर दामिनी पथकाची कारवाई; लाकडी कपार्टमेंट, पडदे अन् संशयास्पद व्यवस्था उघड

October 1, 2026
३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

३४ वर्षीय युवक बेपत्ता; अपहरणाचा संशय, आईची पोलिसांत तक्रार!

October 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group