जळगाव मिरर | 18 ऑगस्ट 2026
शहरापासून नजीक असलेल्या कुसुंबा येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. राहत्या घरामध्ये गळफास घेऊन दीपाली स्वप्नील मोरे (वय २६, रा. कुसुंबा, ता. जळगाव) या विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. कुसुंबा येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील कुसुंबा येथील दीपाली मोरे यांचे पती कामावर गेल्यानंतर घरी एकटीच असताना या विवाहितेने गळफास घेतला. दुपारी पतीने तिला वारंवार कॉल केले, मात्र ती कॉल रिसीव्ह करीत नव्हती. त्या वेळी पतीने शेजारील महिलेला कॉल करून घरी जावून पाहण्यास सांगितले. त्या वेळी ही विवाहिता गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. विवाहितेला शासकीय न वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




















