• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२६

शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील विश्वकर्मा नगरात अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून धाडसी घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत घरातील सुमारे ४५ ते ४६ तोळे सोने आणि १ लाख ५० हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, घरमालक उज्जैन येथील महाकाल दर्शनासाठी बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने रात्री सुमारे १.३० ते २ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाट फोडण्यात आले. कपाटातील सोने आणि रोकड चोरून चोरटा पसार झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराची पाहणी करून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तसेच ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत.

दरम्यान, चोरट्याचा माग काढण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. मात्र, श्वान घराच्या मागील तसेच पुढील परिसरातच घुटमळत राहिल्याने चोरट्याचा ठोस माग काढण्यात यश आले नाही.  पोलिसांनी आता घरातील तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या फुटेजमध्ये एक संशयित चोरटा कैद झाल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या हालचालींच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील ठसे आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, चोरीला गेलेल्या सोन्याचे नेमके वजन आणि रोकड किती होती, याबाबत अधिकृत आकडा गुन्हा दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या सुमारे ४५ ते ४६ तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोकड चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिस तपासातून या घरफोडीतील अधिकृत माहिती समोर येणार आहे. भरवस्तीत रात्रीच्या सुमारास झालेल्या या धाडसी घरफोडीमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अज्ञात चोरट्याचा लवकरात लवकर शोध घेऊन कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Related Posts

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !
क्राईम

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली
जळगाव

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!
जळगाव

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026
मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !
जळगाव

मेहरूणमधील भगिनींतर्फे देशाच्या सीमेवरील जवानांना राख्या सुपूर्द; ‘विचार वारसा फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम !

August 28, 2026
तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
क्राईम

तडीपारचा आदेश धाब्यावर : वरणगावात पुन्हा शिरलेल्या काळेला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 28, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर : जळगावात दोन तरुणांनी घेतला टोकाचा निर्णय !

August 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

डांभुर्णीच्या भर चौकात हवेत गोळीबार; कोळन्हावीच्या सरपंचाला अटक !

August 28, 2026
रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

रामेश्वर कॉलनीत धाडसी घरफोडी; दागिन्यासह रोकड लंपास !

August 28, 2026
रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रा. यास्मिन शेख यांना श्रद्धांजली

August 28, 2026
जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

जगाला जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणाऱ्या बहिणाबाईंची गाथा आता ‘खान्देशची लेकबाय’मधून उलगडणार!

August 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group