जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६
रक्षा बंधन उलटून १ दिवस होत नाही, तोवर भडगाव तालुक्यातील अंजनीनेरा येथील सासर असलेल्या व चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव जवळील बिरोबावाडी येथील माहेरवासीन असलेल्या १९ वर्षीय विवाहितेने दि.२९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहते गळफास घेवून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भडगाव तालुक्यातील अंजनीनेरा येथील सासर असलेली विवाहिता शितल सुनील मोरे (वय १९) ही तालुक्यातील तळेगाव जवळील बिरोबावाडी येथे माहेरी आली. होती. दि.२९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घरातील व्यक्तींना शितल ही घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आली त्यांनी लागलीच तिला स्थानिक रुग्णालयात नेवून चाळीसगाव येथे ग्रामीण रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
शितल मोरेच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय चाळीसगाव यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनी विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गणेश चव्हाण करीत आहेत.


















