जळगाव मिरर | १ सप्टेंबर २०२६
पाळधी ते तरसोद महामार्गावरील एकेरी वाहतुक सुरु असलेल्या महामार्गावर समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात शांताराम केशव पाटील (वय ५८, रा. शिंदखेडा, ता. रावेर) यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असलेले चौघे गंभीर जखमी झाले. हा अपघात दि. ३१ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजता असोदा ते ममुराबाद दरम्यान बायपासवर घडली. याप्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील शिंदखेडा येथील ईश्वर महाजन हे आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे दि. ३१ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा रामचंद्र महाजन हा त्यांचे नातेवाईक शांताराम पाटील, निखील पाटील यांच्यासह जितेंद्र रामदास सोपारकर (एमएच ४८, पी ०७५५) क्रमांकाच्या वाहनाने नाशिकला जाण्यासाठी निघाले. वाहन चालक जितेंद्र सोपारकर यांनी ते चालवित असलेले वाहन जळगाव शहरातून न घेता शहराबाहेरुन गेलेल्या बायपासने घेतले. महामार्गावरुन काही अंतर पुढे गेल्यानंतर महामार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरु असल्याने महामार्गावरील एक बाजू बंद असल्याने दुसऱ्या बाजूने दोन्हीकडील वाहने ये-जा करीत होते.
बायपास महामार्गावरुन जात असतांना असोदा ते ममुराबाद गावादरम्यान, पाळधीकडून जळगावकडे भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०५, डीके ५३१४) क्रमांकाच्या ट्रकने कारला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, या अपघातात कारमधील रुग्ण ईश्वर महाजन यांच्यासह त्यांचे नातेवाईक व चालक गंभीर जखमी झाला.
या अपघातात रामचंद्र महाजन यांच्या डोक्याला व पायाला, निखील पाटील यांना कपाळावर, शांताराम पाटील यांच्या नाकातून रक्तस्त्राव येत होता, तर चालक जितेंद्र सोपारकर यांच्या छातीला मुकामार लागला होता. महामार्गावरुन जाणाऱ्यांनी जखमींना वाहनातून बाहेर काढून तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. जखमींवर जिल्हा शासकी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालया उपचार सुरु असतांना शांतारा पाटील यांचा अपघातानंतर काह वेळाने दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाहून धडक देणाऱ्या ट्रकसह चालक सति अनंतराम ढिल्लो (रा. साकीनाक मुंबई) याला ताब्यात घेतले त्याच्याविरुद्ध रामचंद्र महाज यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखव करण्यात आला आहे.

















