• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 2, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ सप्टेंबर २०२६ 

रक्षाबंधनानिमित्त कुटुंबीयांसह मूळ गावी गेलेल्या वकिलाच्या बंद घरावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारत तब्बल २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचे जवळपास १०.५ तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव शहरातील शिवाजीनगर परिसरात उघडकीस आली.

विशेष म्हणजे चोरट्यांनी घरात प्रवेश केल्यानंतर सीसीटीव्हीच्या वायरी कापून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही फुटेजमध्ये तीन संशयित चोरटे कैद झाले आहेत. या संदर्भात अॅड. नितीन सुरेश पाटील (वय ४२) यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, नितीन पाटील हे पत्नी शुभांगी, मुलगा अथर्व व मुलगी त्रीशा यांच्यासह शिवाजीनगर परिसरात राहत असून चाळीसगाव न्यायालयात ते वकिली करतात. दरम्यान, नितीन पाटील यांच्या घरातील बेडरूममधील लाकडी कपाटाच्या लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेले होते. २७ ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास रक्षाबंधनासाठी पाटील कुटुंबीय घराला कुलूप लावून त्यांच्या मूळ गावी गेले होते. रक्षाबंधन आटोपल्यानंतर ते ३० ऑगस्टला रात्री ११ वाजता चाळीसगावातील घरी परतले. त्यावेळी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

घरात प्रवेश केल्यानंतर त्यांना साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. घराच्या आतील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडलेला होता. बेडरूममधील लाकडी कपाटाचे लॉक तोडून लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचे आढळले. तर, अॅड. पाटील यांनी तत्काळ घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तीन पुरुष चोरटे कॅमेऱ्यात दिसून आले. तसेच चोरट्यांनी सीसीटीव्हीच्या वायरही कापल्याचे आढळले. हे फुटेज त्यांनी सुरक्षित ठेवले आहे. तर, घटनेची माहिती मिळताच मित्र व शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना माहिती दिल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी तपासासाठी पुरावे संकलित केलेत. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरट्यांनी ८७ हजार ५०० रुपयांची ३५ ग्रॅमची सोन्याची मंगलपोत, १ लाख ३० हजाराचा ५२ ग्रॅमचा सोन्याचा राणीहार, १५ हजारांची ६ ग्रॅमची सोन्याची अंगठी, २५ हजारांचा १० गॅमचा सोन्याचा वेढा, ५ हजारांची प्रत्येकी १ गॅमचे सोन्याची दोन बिस्किटे असा एकूण २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Related Posts

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट
जळगाव

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !
क्राईम

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026
एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती
क्राईम

एमआयडीसी परिसरात पोलिसांचा सापळा; इफेड्रिन-गांजासह ११ लाखांचा मुद्देमाल हाती

September 1, 2026
जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?
क्राईम

जिल्ह्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीपणामुळे महामार्गाने घेतले २३ दिवसात ५ बळी : जबाबदार कोण ?

September 1, 2026
जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर
क्राईम

जळगाव बायपासवर भीषण अपघात : भरधाव ट्रकची कारला समोरून धडक; एकाचा मृत्यू, चौघे गंभीर

September 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार : उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली अशोक जैन यांची भेट

September 2, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !

रक्षाबंधनासाठी गेले गावाला; परतले तेव्हा घर साफ : वकिलाच्या घरातून २.६२ लाखांचे सोने लंपास !

September 2, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

बसचालकाला शिवीगाळ पडली महागात : प्रवाशांसह बस थेट पोलीस ठाण्यात !

September 2, 2026
अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

अवघ्या ५ तासांत चोरीचा छडा : १२ हजारांची रोकड लंपास करणारे दोघे जेरबंद, जळगाव शहर पोलिसांची कामगिरी !

September 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group