जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२६
पाचोरा तालुक्यातील सामनेर गावाजवळ रविवारी (दि. ६) दुपारी तहसीलदारांचे शासकीय वाहन शासकीय कामानिमित्त जळगावकडून चाळीसगाव येत असताना अपघात झाला. वाहनाच्या स्टेअरिंगमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वेळी अपघाताच्या वाहनात केवळ चालक जावेद शेख हेच होते.

या दुर्घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी श्रीराम केअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे नायब तहसीलदार डॉ. संदेश निकुंभयांनी तत्काळ पाचोरा येथे धाव घेतली आणि जखमी चालकाची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या अपघातात शासकीय वाहनाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती असून, घटनेबाबत संबंधित प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. पुढील कार्यवाही सुरू आहे.




















