• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ सप्टेंबर २०२६ 

पाळधी ते तरसोद सुरु असलेल्या बायपास महामार्गावर एकेरी वाहतुक सुरु आहे. मात्र त्याठिकाणी कोणताही सुचना फलक नसल्यामुळे दुसऱ्या मार्गावरील वाहने देखील तेथून जात आहे. त्यामुळे रविवार दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी ट्रेलर व कंटेनरची समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या कॅबीनचा चुराडा होवून चालक गंभीर जखमी झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. ही घटना रविवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तरसोद फाट्याजवळून काही अंतरावर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार,  वर्षभरापुर्वीच तयार झालेला पाळधी ते तरसोद बायपास महामार्ग पहिल्याच पावसामुळे खचला. त्याच्या दुरुस्तीचे काम सुरु असून धुळ्याकडून नागपूरकडे जाणारी एकच बाजू वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, एकेरी वाहतुक सुरु असतांना चंद्रपूर येथून लोखंडी अँगल घेऊन जाणार (एनएल ०१, एके ११०४) क्रमांकाचा ट्रेलर जळगाव शहरानजीक तरसोद गावाजवळ आला त्यानंतर ट्रेलर हा शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून न जाता बायपासने गेला. एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने जात असताना समोरुन येणाऱ्या (एचआर ४७, एफ २५८१) क्रमांकाच्या कंटेनर आणि ट्रेलरची समोरासमोर धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रेलरच्या पुढील भागाच चुराडा होऊन कंटेनरचेही मोठे नुकसान झाले आहे.

या भीषण अपघातात ट्रेलरचा चालक अंग्रेससिंग अरुंधवा (वय ५६, रा. रायपूर, छत्तीसगढ) याच्यासह ट्रेलरचा चालक जखमी झाला. यातील अरुंधवा यांच्य दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांनी एकमेकांना दिलेली धडक इतकी भीषण होती की, या धडकेत ट्रेलरची कॅबिन दबल्याने चालकाचे दोन्ही पाय स्टेअरींगखाली अडकून पडले होते. महामार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र चालकाल बाहेर काढता येत नसल्याने ६० ते ७० जणांन मिळून कॅबिनचा दरवाजा तोडून चालकाला बाहेर काढून त्याला लागलीच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शहराबाहेरुन गेलेल्या या बायपासवर अपघात झाल्यानंतर तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र दोघांकडून घटनास्थळाच्या हद्दीबाबत एकमेकांकडे बोट दाखविण्यात आले. या अपघाताबाबत संबंधित पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता, त्यांच्याकडून हा अपघात आमच्या हद्दीत नसल्याचे सांगण्यात आले. या टोलवाटोलमध्ये रात्रीपर्यंत अपघातासंदर्भात कोणत्याच पोलीस ठाण्यात गुन्हा तर सोडाच साधी नोंद देखील झालेली नव्हती.

Related Posts

पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू
क्राईम

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !
क्राईम

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026
विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!
जळगाव

विद्यार्थ्यांच्या भाषण, कविता अन् सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला शिक्षक दिन!

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !
क्राईम

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन !

September 5, 2026
पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव
जळगाव

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीद्वारे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव

September 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

तिसऱ्या मजल्याची बनावट परवानगी दाखवून ३.७२ कोटींची फसवणूक : जळगावात ७ जणांवर गुन्हा !

September 7, 2026
पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

पिकांना पाणी भरताना काळाचा घाला : पाळधीत विजेच्या धक्क्याने ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

September 7, 2026
पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

पाळधी-तरसोद बायपासवर भीषण अपघात; ट्रेलर-कंटेनरच्या धडकेत कॅबिनचा चुराडा

September 7, 2026
चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

चाळीसगावच्या तहसीलदारांच्या वाहनाला अपघात : चालक किरकोळ जखमी !

September 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group