• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 9, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ ऑक्टोबर २०२६

जिल्ह्यातील अवैध वाळू साठा प्रकरणात जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेत कानळदा येथील मंडळ अधिकारी छाया कोळी यांना निलंबित केले आहे. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी हा आदेश जारी केला आहे. या कारवाईमुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली असून अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला पाठीशी घालणाऱ्या घटकांना प्रशासनाने स्पष्ट इशारा दिल्याची चर्चा आहे.

ऑगस्ट महिन्यात जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी कानळदा शिवारातील गिरणा नदीकाठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली होती. दुचाकी व पायी नदीपात्रात उतरून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला होता. पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू साठे आढळून आल्याने संबंधित यंत्रणांना तत्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे वाळू साठे जप्त करण्यात आले होते.

पाहणीदरम्यान जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी कानळदा, खेडी आणि परिसरातील विविध नदीकाठ भागांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधला होता. अवैध वाळू वाहतुकीमुळे निर्माण होणारे प्रश्न, महसुलाचे नुकसान आणि पर्यावरणीय परिणाम याबाबत चर्चा करत त्यांनी स्थानिक नागरिकांनाही सहकार्याचे आवाहन केले होते. यावेळी संबंधित महसूल अधिकाऱ्यांची कानउघडणी करत वाळू माफियांविरोधात कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी अवैध वाळू उपसा, वाहतूक आणि साठवणुकीबाबत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबविण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्याच भूमिकेचा भाग म्हणून मंडळ अधिकारी छाया कोळी यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे मानले जात आहे. या कारवाईमुळे महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात जळगाव जिल्हा महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीविरोधात राज्यातील सर्वाधिक कारवाया केल्या आहेत. जिल्ह्यात ७०० हून अधिक कारवाया करण्यात आल्या आहेत.

दुष्काळी आढावा दौऱ्यादरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. अवैध वाळू व्यवसायात सहभागी असलेल्या घटकांवर तसेच त्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Related Posts

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
जळगाव

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026
प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !
जळगाव

प्रेमविवाहाचा थरारक शेवट? तापी नदीत तरुण दाम्पत्याचा मृत्यू; घटनेने खळबळ !

October 9, 2026
भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी
क्राईम

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

October 8, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

इन्स्टाग्रामवर कपडे मागवले, खात्यातून ८७ हजार गायब : डिलिव्हरीच्या बहाण्याने महिलेची फसवणूक !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group