जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२६
यावल तालुक्यातील चोपडा मार्गावर साकळी या गावाजवळील साईराम जिनिंगच्या समोर दुचाकी आणि कारचा अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तीन जण हे जखमी झाले आहे. त्यातील एकाची प्रकृती गंभीर असून जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार केल्यानंतर त्यातील दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साकळी गावाच्या जवळ साईराम जिनिंग आहे. या जिनिंगच्या समोर यावल कडून चोपड्याकडे कार क्रमांक एम. एच. ०५ बी. एल. ४७४९ घेऊन चालक विनोद कुमार हा श्रीक्षेत्र मनुदेवी येथे जात होता. तर साकळी कडून यावल कडे दुचाकी क्रमांक एम. पी. ६८ झेड. एफ. १०३७ घेऊन प्रवीण किशोर तेली (वय २१), हर्षल राजेंद्र माळी (वय १७) व तय्यब राजू तडवी (वय १६) रा. साकळी हे जात होते. दरम्यान दोघं वाहनाचा समोरासमोर अपघात घडला. या अपघातामध्ये दुचाकीस्वार तिघे जखमी झाले. यातील प्रविण तेली याला डोक्याला जबर दुखापत आहे आणि हर्षल माळी याला देखील डोक्यास दुखापत असल्याने दोघांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.



















