जळगाव मिरर | १६ ऑक्टोंबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील गोकुळ गबरू राठोड (वय ४५) यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरापूर रेल्वे स्टेशनजवळ झालेल्या अपघातात नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील गोकुळ गबरू राठोड (वय ४५) हे ठार झाले आहेत. तर, गोकुळ राठोड यांना १५ ऑक्टोबरला सायंकाळी ५.३० वाजेपूर्वी चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, मयत गोकुळ राठोड हे न्यायडोंगरी येथून चाळीसगावकडे वेत होते. त्यांचे काका सीताराम मंगू राठोड यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही माहिती मिळताच स.पो.नि. विजय माळी यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या घटनेचा तपास हवालदार तुकाराम चव्हाण करत आहेत. याप्रकरणी अकस्मात मृत्युची चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.



















