जळगाव मिरर | २० ऑक्टोबर २०२६
चाळीसगाव तालुक्यातील गौताळा अभयारण्यातील काळवीट विक्री प्रकरणाच्या अटक प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याशी धक्काबुक्की करणे, अश्लील भाषेचा वापर करणे तसेच वनमजुराला पळून जाण्यास मदत केल्याचा ठपका ठेवत वनरक्षक विवेक गोकूळ सोनवणे याला निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. वनरक्षक विवेक सोनवणे आणि वनमजूर सुभाष शिवाजी कुऱ्हाडे यांच्या संगनमताने काळवीट विक्रीच्या उद्देशाने हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याचा दावा क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनने केला आहे. याबाबत वरिष्ठ वनाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली होती. काळविटच्या सुटकेसाठी कारवाई सुरू असताना वनमजुराला कार्यालयात आणण्याची जबाबदारी वनरक्षकावर होती. मात्र, याच प्रक्रियेदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप आहे. दरम्यान, वनमजुराने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत्महत्येची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकारामुळे वन विभागातील शिस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर घडलेल्या या प्रकाराची गंभीर दखल घेऊन वनरक्षक विवेक सोनवणे यांच्यावर महाराष्ट्र शासनाच्या शिस्त व अपील नियमांनुसार बडतर्फीसारखी कठोर कारवाई करावी, अशी मागणी क्राईम अँड करप्शन कंट्रोल असोसिएशनचे अध्यक्ष अश्विन खैरनार यांनी केली आहे. याबाबत सहायक वनरक्षक विशाल लोंढे यांनी सांगितले की.




















