जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२६
गणित ऑलिम्पियाडच्या प्रतिष्ठित Indian Olympiad Qualifier in Mathematics (IOQM) परीक्षेत जळगाव, भुसावळ व फैजपूर येथील पेस आणि जयिष्णू आयआयटी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामुळे शैक्षणिक क्षेत्रात संस्थेच्या गुणवत्तापूर्ण मार्गदर्शनाची पुन्हा एकदा छाप उमटली आहे.

या परीक्षेत संस्थेच्या चार विद्यार्थ्यांनी यश मिळवत पुढील टप्प्यातील Regional Mathematics Olympiad (RMO) परीक्षेसाठी पात्रता मिळवली आहे. यामध्ये इशान डहाके (इयत्ता १२ वी, गुण ५६), भावी इंगळे (इयत्ता १२ वी, गुण ५५), वीर शाह (इयत्ता १२ वी, गुण ५३) आणि कलश मुंदडा (इयत्ता १० वी, गुण ४५) यांचा समावेश आहे.
देशभरातून हजारो विद्यार्थी सहभागी होणाऱ्या या परीक्षेत यश मिळवणे ही विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेची, गणितीय कौशल्यांची आणि सातत्यपूर्ण मेहनतीची पावती मानली जाते. कठीण स्पर्धेत यश मिळवत या विद्यार्थ्यांनी संस्थेचा नावलौकिक वाढवला आहे.
या यशाबद्दल पेस आणि जिज्ञासू आयआयटी गुरुकुलच्या संचालक सौ. सविता वाणी, दिलीप वाणी तसेच संपूर्ण पेस टीमने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, पुढील टप्प्यातील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, संस्थेतर्फे ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी ACE of PACE प्रवेश व शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. ही परीक्षा १५ व २९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत होणार असून, त्याद्वारे विद्यार्थ्यांना १० ते ४० टक्के तसेच ७० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती मिळवण्याची संधी उपलब्ध होणार असल्याचे संस्थेने कळविले आहे.




















