जळगाव मिरर | २८ ऑक्टोबर २०२६
कौटुंबिक वादावर तोडगा काढण्यासाठी सुरू असलेल्या बैठकीदरम्यान सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर) या तरुणाचा धारदार शस्त्राने भोसकून खून व त्याच्या कुटुंबीयांना मारहाण केली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यात अटकेतील सहा जणांना दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवाजी नगरातील सनी डोळे या तरुणाच्या घरात कौटुबिंक वादातून त्याच्या खून केल्याची घटना दि. २७ ऑक्टोबर रोजी घडली होती. या प्रकरणी मयताचा मेहुणा सुरज वानखेडे याच्यासह मेहुण्याचे भाऊ पंकज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ), चुलत भाऊ निकेश मधुकर वानखेडे (रा. आयोध्यानगर, जळगाव), मेहुण्याचे वडील नारायण वानखेडे, आई मंगला वानखेडे, काकू प्रमिला मधुकर वानखेडे या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना मंगळवार दि. २७ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर केले असता दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.





















