जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६
रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शाम नगर परीसरात राहणारे किरण नंदकिशोर वासेवाय हे दिनांक 12/11/2026 रोजी संपुर्ण कुटूंबासह पंढरपुर येथे देवदर्शनासाठी गेले होते. दिनांक 15/11/2026 रोजी सदर फिर्यादी हे घरी आले असता त्यांना घराचा कुलूप कोंडा तोडलेला दिसला. घरात जावुन पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागीणे, 43 इंची टीव्ही, व 12,000/- रुपये रोख रक्कम असा एकुण 1,11,000/- रुपये असे चोरी गेल्याचे समजल्याने त्यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला घरफोडी झाल्याबाबत फिर्याद दिली आहे.. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी गुन्हे शोधपथक अधिकारी व अंमलदार यांना सदर घरफोडी गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथकाने तांत्रीक बाबींचे विश्लेषण करुन राजीवगांधी नगर भागातील रहीवासी असलेला शक्तीसिंग उर्फ हग्गु जिवनसिंग जुन्नी व त्याच्या सोबत अजुन त्याचे दोन साथीदार असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

परंतु हग्गुसिंग हा घरी मिळुन येत नव्हता. दिनांक 19/11/2026 सपोनी अंकुश वारुंगसे यांना हग्गुसिंग हा जळगांव रेल्वे स्टेशन वरुन बाहेर गावी पळुन जात असल्याची माहीती मिळाल्याने, गुन्हेशोध पथक अधिकारी पोउपनि सचीन रणशेवरे व पथकाने रेल्वेस्टेशन वर तात्काळ जावुन त्यास पळुन जाण्याच्या प्रयत्नात असतांना ताब्यात घेतले. त्यास अटक करुन त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार सुबेरसिंग राजुसिंग टाक आणी शेरुसिंग सोजीतसिंग भोंड दोन्ही रा आत्महत्या कॉलनी, जळगांव यांचे सोबत केला असल्याची कबुली दिली. हग्गुसिंग याची पोलीस कस्टडी रीमांड घेवुन त्याचेकडुन गुन्हयातील गेलेला संपुर्ण मुद्देमाल त्यात, 1) 05 ग्रॅम सोन्याची अंगठी, 2) 01 ग्रॅम सोन्याची अंगठी, 3) 02 ग्रॅम वजनी सोन्याचे कानातील टॉप, 4) सोन्याची कानातील फुली 01 ग्रॅम वजनी, 5) 06 ग्रॅम वजनी सोन्याचे मंगळसुत्र, 6) चांदीचा गोफ 02 भार वजनी, 7) 01 भार वजनी चांदीचे ब्रासलेट, 8) 05 भार वजनी चांदीचे तोरडया, 9)चांदीचे देव, चांदीचे कडे, फुलपात्र, 10) 43 इंच टीव्ही सॅमसंग कंपणीचा असा संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हग्गुसिंग जुन्नी याचे साथीदार हे फरार झाले असुन त्यांचा शोध सुरु आहे.
सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री संदीप गावीत, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक श्री मधुकर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनी अंकुश वारुंगेस, गुन्हे शोधपथक अधिकारी पोउपनि सचीन रणशेवरे, पोउपनि संजय तडवी, पोहेका जितेंद्र राजपुत, पोना/योगेश बारी, पोका/सुमेध इंधाटे, मुकूंद गवते, मनोज मराठे , सागर नन्नवरे, जुलालसिंग परदेशी, मोतीलाल चौधरी यांनी केली आहे.





















