जळगाव मिरर | २६ नोव्हेंबर २०२६
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव शहरातील विविध भागांत नागरिकांना भारतीय संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात आले. संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्ये, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जनजागृती व्हावी तसेच प्रत्येक नागरिकाला संविधानाचे महत्त्व समजावे, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व महिला सदस्यांनी विविध भागांत जाऊन नागरिकांना संविधान प्रती भेट दिल्या. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशाच्या लोकशाहीचा भक्कम आधार आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचा आदर करून त्यातील मूल्यांचे पालन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले. या उपक्रमात श्रीमती ज्योती राणे, नूतन तासखेडकर, वंदना मंडावरे, रेणुका हिंगू, किमया पाटील, हर्षा गुजराती आणि तेजल वनरा यांनी सक्रिय सहभाग घेतला. महिलांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले.




















