जळगाव मिरर | २८ नोव्हेंबर २०२६
महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहराच्या वतीने आज शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी पद्मालय विश्रामगृह येथे शहर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जळगाव शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष तसेच मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमध्ये आगामी डिसेंबर महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय पक्षाध्यक्ष *मा. राजसाहेब ठाकरे* यांच्या नियोजित जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. दौऱ्याच्या स्वागताचे नियोजन, संघटनात्मक बांधणी, पक्षविस्तार आणि आगामी राजकीय वाटचाल यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी आपापली मते मांडली.
या बैठकीचे विशेष आकर्षण म्हणजे जळगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील जवळपास १०० उत्साही युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत या युवकांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. युवकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे जळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद वाढत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे पक्षसंघटनेला निश्चितच नवी ऊर्जा आणि बळ मिळणार आहे. आगामी काळात जळगाव शहरासह ग्रामीण भागात संघटना अधिक मजबूत करून पक्षाचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
उपस्थित पदाधिकारी : जिल्हा अध्यक्ष ॲड जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उप महानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, चेतन पवार, संजय मोती,महेंद्र सपकाळे, राहुल चव्हाण, शेतकरी सेनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश पवार, यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केलेले युवक : कुंदन पाटील, गिरीश इखे, जितेंद्र गोरडे, सचिन थोरात, दिवेश पाटील, राजेंद्र पाटील, अक्षय कोळी, लोकेश परदेशी, पंकज परदेशी, सुनील मानके, महेश पाटील, दिवेश ठाकूर, राहुल पाटील, अभय ठाकूर, विशाल पाटील, रोशन लोधी, लकी ठाकूर, दीपक ठाकूर, साहिल भालेराव, रुपेश चौधरी, पियुष परदेशी, सुनील परदेशी, कल्पेश परदेशी, धीरज परदेशी भूषण पाटील, भूषण पाटील, जयेश परदेशी, कार्तिक पाटील, भावेश सूर्यवंशी, मोक्ष गायकवाड, सुमित कोळी, निखिल पटेल, अजय साळवे, दीपक पारधी, हिमेश कोळी, साई पाटील, रोहित पाटील, आकाश कोळी, हर्षल सोनवणे, राजेंद्र बारी, हर्षल तांदळे, भूषण पाटील, दत्ता बारी, मुरलीधर पाटील, मनोज पाटील, गजानन पाटील, सादिक तडवी, विशाल विखे, विशाल इखे, दिनेश इखे, निवृत्ती इखे, मिथुन चव्हाण, कृष्णा वाघ, मुकेश वाघ, सागर वाघ, जोर खाटीक, तुषार पाटील, गणेश पवन पाटील, पाटील, दुर्गेश शिंदे, मुरलीधर पाटील, निलेश पाटील, ईशान्य पाटील, प्रशांत मानके, पवन सोन्ने, हर्षल गावंडे, किर्तीवर्धन पाटील, यांच्यासह असंख्य तरुणांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षप्रवेश केला,




















