पारोळा : प्रतिनिधी
येथील मोठे श्री राम मंदिराच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती अंतर्गत रुग्णसाहित्य सेवा केंद्राचे उदघाटन नुकतेच करण्यात आले. या केंद्राच्या गोरगरिबांना आधार मिळणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून १९७२ पासून रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. रुग्णसेवा ही काळाची गरज असून गोरगरीब रुग्णासाठी जनकल्याण समितीच्या माध्यमातून रुग्ण साहित्य उपलब्ध करण्यात आल्याने गोरगरिबांना आधार मिळणार असल्याचे जनकल्याण समितीचे जिल्हाकार्यवाह विनोद कोळी यांनी सांगितले. रुग्ण साहित्याच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णाची सेवा घडणार असली तरी या साहित्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन डाँ.संभाजीराजे पाटील यांनी केले.
यावेळी संघचालक मुकेश चोरडिया, तालुका कार्यवाह आकाश बडगुजर, सहकार्यवाह प्रितेश जैन, डाँ.सुमित हलगे, डाँ.चेतन बडगुजर, डाँ.सुदर्शन जैन, उद्योजक गोपाल अग्रवाल, प्रेरणा इन्स्टिट्यूटचे संचालक धीरज महाजन, श्रीकांत पाठक, डॉ भूषण चव्हाण, डॉ निलेश चोरडिया, डॉ चेतन नाईक, ऍड हेमंत सोनवणे, मनन संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन, अभिषेक फंड, नयन चौधरी, भावेश पाटील, राहुल महाजन, स्वप्नील महाजन, मयूर महाजन उपस्थित होते.



















