मुंबई : प्रतिनिधी
राज्यात शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी शिंदे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात चांगलेच राजकिय चर्चेला उधान आले होत. मनसेची भाजपशी जवळीक वाढत चालली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा झाली, याची तपशील अद्याप समोर येऊ शकली नाही. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर आता राज ठाकरे-फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहे. या भेटीनं चर्चांना उधाण आले आहे.