जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मेहरूण परिसरातील जयदुर्गा प्राथमिक-माध्यमिक विद्यालय व कै.कौतीक चावदस महाजन उच्च माध्यमिक विद्यालय येथे आज ३१ रोजी मोठ्या उत्साहाने ढोल ताश्याच्या गजरात श्री गणेशाचे आगमन विद्यालयात झाले.
यावेळी पर्यावरण पूरक अशा शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना जळगाव शहराच्या प्रथम नागरिक महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थेचे सचिव ललित धांडे तसेच विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका ज्योती इंगळे व प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सागर कोल्हे सर उपस्थित होते. त्याचबरोबर श्रींच्या स्वागतासाठी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून लेझीम व झांज पथकाच्या माध्यमातून आपल्या कलाकृती सादर केल्यात.अशा आनंदाच्या उत्साहाच्या वातावरणामध्ये श्रींच्या आगमनाची तयारी करण्यात आली.यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेतर सहकारी यांनी अथक परिश्रम घेतले.