
जळगाव : प्रतिनिधी
भारतीय केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या “राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकाथॉन – २०२२” स्पर्धेत आपल्या मेहरून गावामधील रहिवासी मा.श्री.ज्ञानेश्वर बाबुराव घुगे यांची कन्या कु.माधुरी ज्ञानेश्वर घुगे हिने देशातून प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी व्ही.सी. द्वारे संवाद साधुन अभिनंदन केलं.
याच कार्याची दखल घेत आज दि ३१ रोजी क्षितिज फाउंडेशनतर्फे कू. माधुरी ज्ञानेश्वर घुगे व तिच्या पालकांचा शाल व श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला.व अभिनंदन केले. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. यावेळी क्षितिज फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी ,विशाल सानप, विशाल सोनवणे, अनंत ढाकणे, नरेन घुगे, मयूर घुगे,राहुल पाटील,आकाश पाटील,अमोल कोळी,जयेश पाटील हे उपस्थित होते




















