• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

गावाची समंजस भूमिका ही प्रगतीला तारक – ना. गुलाबराव पाटील

डिक्साई व सावखेडा खुर्द येथे ८६ लाखांच्या कामांचे गुलाबभाऊंच्या हस्ते भूमिपुजन व लोकार्पण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 4, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
गावाची समंजस भूमिका ही प्रगतीला तारक – ना. गुलाबराव पाटील
Share on FacebookShare on Twitter
जळगाव : प्रतिनिधी
विकासकामांमधील सर्वात महत्वाचा घटक हा गावाची समंजस भूमिका असतो. ही भूमिका सकारात्मक असेल तर गावाची प्रगती ही अधिक वेगाने होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील सावखेडा खुर्द व डिक्साई येथे अनुक्रमे ३४ आणि ५२ अशा ८६ लक्ष रूपयांच्या विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यात पाणी पुरवठा योजना, व्यायामशाळा, स्मशानभूमि सुशोभीकरण, पेव्हर ब्लॉक आदी कामांचा समावेश होता. याप्रसंगी त्यांनी गावातील एकजुट ही महत्वाची असून विकासकामांमध्ये कोणतेही राजकारण करता कामा नये असे प्रतिपादन केले. तर येत्या काळात डिक्साई फाटा ते गाव तसेच पेट्रोल पंप ते जिनींग कानळदा या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा देखील ना. गुलाबराव पाटील यांनी केली.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सावखेडा खुर्द आणि डिक्साई येथील विविध विकासकामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले. यात डिक्साई येथे ३९ लक्ष रूपयांच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमिपुजन करण्यात आले. यात, जलकुंभ अर्थात पाण्याची टाकी, पाईपलाईन आणि पाण्याच्या स्त्रोताच्या ठिकाणच्या कुपनलिकेचा समावेश असून या कामाचा शुभारंभ ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यासोबत याच गावात स्मशानभूमि सुशोभीकरण आणि बांधकाम-१० लक्ष तर पेव्हींग ब्लॉक-३ लक्ष या कामांचे भूमिपुजन करण्यात आले. तर, सावखेडा खुर्द येथे २४ लक्ष रूपयांच्या निधीची तरतूद असणार्‍या पाण्याच्या टाकीचे भूमिपुजन करण्यात आले. तर येथेच १० लक्ष रूपयांमधून उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे लोकार्पण ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी डॉ. कमलाकर पाटील, माजी सभापती भरत बोरसे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, माजी सभापती जनाआप्पा पाटील, मुकेश सोनवणे , लकी टेलर, पी.आय. रामकृष्ण कुंभार, पी.एस.आय एस. जे. वाणी, नारायण आप्पा सोनवणे, सावखेडा खु.येथिल सोसायटी चेअरमन जितेंद्र पाटील, सरपंच ऊषाबाई अरविंद सपकाळे, उप सरपंच प्रकाश कृष्णात पाटील, ग्रा. पं. सदस्य संगिता पाटील, छाया पाटील, अर्चना सपकाळे, मगला पाटील, भरत सपकाळे, बेबबाई भिल्ल, प्रविण सपकाळे, दिलीप जगताप, साहेबराव पाटील, लीलाधर पाटील, मदन पाटील,डीकसाई येथिल सरपंच अहिल्याबाई, उपसरपंच सुनंदाबाई सूर्यवंशी, ग्रा पं सदस्य सुनिल चव्हाण, पोलीस पाटील भुवनेश्वर चव्हाण, दगडू चव्हाण, किशोर कोळी, रुखमांबाई कोळी, चित्राबाई कोळी यांच्यासह डिंकसाई, सावखेडा खु., व परिसरातील पदाधिकारी व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक माजी सरपंच जितेंद्र पाटील यांनी केले. आभार अरूण चव्हाण यांनी मानले.
याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण आजवर विकासाभिमुख वाटचाल केली आहे. विकास करतांना आपण कोणताही भेदभाव केला नाही. हीच भूमिका गावकर्‍यांनी घेण्याची गरज आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे, मात्र, विकासकामांसाठी एकत्र यावे. आपण देखील कधी कामांमध्ये भेद केला नाही. सावखेडा खुर्द गावासाठी पाण्याची टाकी तर डिक्साईसाठी पाण्याच्या टाकीसह पूर्ण योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावांमधील पाण्याची समस्या कायमची संपुष्टात येणार आहे. तर सावखेडा येथील व्यायामशाळेच्या माध्यमातून तरूणाईला शरीरसंवर्धन करण्यासाठी चांगली सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादनही ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !
क्राईम

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू
क्राईम

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !
क्राईम

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026
आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!
क्राईम

आहुजा नगरजवळ भरधाव ट्रालाची पादचाऱ्याला धडक; ३५ वर्षीय तरुण गंभीर, चालक फरार!

August 9, 2026
रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!
क्राईम

रिक्षात राहिली दीड लाखांची बॅग; ‘नेत्रम’च्या कॅमेऱ्यांनी शोधला धागा, जिल्हा पेठ पोलिसांनी दागिने केले परत!

August 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ट्रॅक्टरची दुचाकीला जोरदार धडक; आरोग्यदूत शिवाजी पाटील जखमी !

August 10, 2026
कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

कर्तव्य आटोपून घरी परतताना काळाचा घाला : दुचाकी पाटात पडल्याने अमळनेर पोलीस हेडकॉन्स्टेबलाचा दुर्दैवी मृत्यू

August 10, 2026
उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

उज्ज्वल भवितव्याचे स्वप्न अधुरेच : प्रवेशासाठी धुळे जाताना १९ वर्षीय यशचा रेल्वे अपघातात मृत्यू !

August 10, 2026
पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

पथदिवे बसवताना काळाचा घाला : वीजेच्या धक्क्याने झिरो वायरमनचा दुर्दैवी मृत्यू !

August 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group