
जळगाव : प्रतिनिधी
शहरात जायंट्स ग्रुप ऑफ तेजस्विनीचा द्वितीय पदग्रहण सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी प्रथम बेल वाजवून कार्यक्रमाची सुरुवात झाली. जायंटस फेडरेशन २अ अध्यक्ष अनुपकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली शपथ विधी करण्यात आला.
यावेळीं कार्यकारिणी सदस्य व नूतन सदस्य तसेच नूतन अध्यक्ष यांचा शपथ विधी उपाध्यक्ष जायंटस वेल्फेअर फाऊंडेशन फेडरेशन २अ सौ संगिता पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला यावेळी मावळत्या जळगाव तेजस्विनी ग्रूप ऑफ जळगाव संस्थापक अध्यक्षा सौ मनिषा पाटील यांनी नूतन अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांना पदभार सोपविला.याप्रसंगी प्रमुख अतिथी आमदार राजूमामा भोळे, जायंटस स्पेशल कमिटी मेंबर मा नगरसेवक शहादा रविंद्र जमादार माजी अध्यक्ष बाबुरावजी बगाडे, श्री भरतदादा चौधरी समाज कल्याण विभाग, जायंटस माजी अध्यक्ष श्री डी एल जाधव, महाराष्ट्रातील पारंपरिक पीक वाण प्रचारक आणि प्रसारक वरिष्ठ महविद्यालय प्राचार्य धडगाव नंदुरबार डॉ एच एम पाटील, उपाध्यक्ष सौ संगिता पाटील, सौ सुरेखा पाटील हिरकणी डायरेक्टर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष अनुपकुमार जोशी यांनी कार्यपद्धती विषयी मार्गदर्शन केले आमदार राजूमामा भोळे व महापौर जयश्रीताई महाजन यांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. समाजकल्याण विभागातील भरत चौधरी यांनी सामाजिक कामासाठी पाच हजार रुपयांची देणगी दिली.
याप्रसंगी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या मावळत्या संस्थापक अध्यक्षा मनिषा पाटील यांनी जायंटस ग्रुपच्या मागील वर्षात केलेल्या कामाबद्दल माहिती प्रास्ताविकातून दिली. नूतन अध्यक्ष श्रीमती ज्योती राणे यांनी वर्षभर करावयाच्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सारिका पाटील व आभार प्रदर्शन नेहा जगताप यांनी केले. याप्रसंगी उपस्थित तेजस्विनी सहेली ग्रुपच्या नूतन तासखेडकर, किमया पाटील, रेणुका हींगू, सौ लीना पवार, सौ संगिता बरडे, पुष्पा पाटील, संगिता चौधरी, माधुरी शिंपी, सुचिता पाटील, आशा मौर्य,शशी शर्मा, पुनम पाटील, उपस्थित होत्या.





















