
जळगांव : प्रतिनिधी
माधवबाग द्वारा सुचविलेली उपचार पध्दती, आहार, व्यायाम, पंचकर्म व योग्य जिवनशैलीचा अवलंब करीत हृदयरोग, मधुमेह या आजारावर विजय मिळविणाऱ्या नागरिकांसाठी विजयोत्सव आरोग्याचा २०२२ या कार्यक्रमाचे आज हॉटेल रॉयल पॅलेस येथे आयोजन करण्यात आले होते.
या विजयोत्सवाला आकर्षण म्हणून सिने अभिनेत्री महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब उपस्थित होत्या. तर आरआयसी हेड अनंत नेरळकर, मराठावाडा विभागाचे माधवबाग ॲडमिन अनिल कोरडे, माधवबागचे आरोग्य अधिकारी प्रशांत याकुंडी, जळगांवचे माधवबाग संचालिका डॉ. श्रद्धा महाजन-माळी, डॉ. श्रेयस महाजन, जी.टी. महाजन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करुन कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. प्रसंगी सिने अभिनेत्री महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब यांच्या हस्ते हृदयरोग व मधुमेहावर विजय मिळवलेल्या रुग्णांचा/नागरिकांचा सन्मानपत्र, मेडल देऊन सन्मान करण्यात आला. प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.टी. महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन उमा बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, सुजित माळी, पूजा पाटील, विजय बोडदे, चेतन निंबोळकर, सोमनाथ शिंपी, योगेश चौधरी, सुरेश राजपूत, पंकज कासार यांनी परिश्रम घेतले.





















