
जळगाव : प्रतिनिधी
शहरातून धुळेकडे जाणाऱ्या महामार्गालगतच्या वाटिका आश्रम परिसरातील तीन पुरुष महिलांच्या वेशात येऊन घरात घुसून जबरदस्तीने पैसे लुबाडण्याचा धक्कादायक उघडकीस आला आहे. दरम्यान सतर्क नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडत यांनी लुबाडलेले पैसे परत मिळवून दिलेले आहेत. परंतु या प्रकरणी पोलिसात कोणीही तक्रार देण्यास समोरून आल्याने गुन्हा दाखल झालेला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी की शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग लगत खोटे नगर शेजारी वाटिका आश्रम आहे. या भागात काहीशी विरळ वस्ती आहे. रविवारी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमाराला या परिसरात महिलांच्या वेशात ( किन्नर) आलेले तीन पुरुष वेगवेगळ्या उघड्या घरांमध्ये हसत होते येथे समोर आलेल्या मुलं, मुली, वृद्ध यांच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळत होते.
या ठिकाणी राहणार एका 14 वर्षीय मुलीची आई पोळ्या करण्यासाठी बाहेर गेलेली असताना घरात तिची बहीण व आजी होती. ती साफसफाई करत असताना यातील एक जण येऊन त्याने वृद्ध महिलेला ढकलून देत मुलीचा गळा पकडून घरातून पैसे काढून आणायला सांगितले तिने त्याला साडेतीन हजार रुपये काढून दिले.एका तरुणाला या भामट्यांनी पैसे दे तुला आशीर्वाद देतो असेच सांगितले. यावर त्या तरुणाने पाकीट काढून त्यातून दहा रुपये देऊ केले असता, त्याची पाकीटच हिसकावून त्यातील हजार रुपये काढून पाकीट परत दिले.
या परिसरात अशा प्रकारच्या घटना यापूर्वीही झालेल्या असून रविवारच्या घटनेची माहिती मिळताच काही तरुणांनी पुढे येऊन यात तिघा जणांना पकडून एकाच ठिकाणी आणले. आणि त्यांच्याकडून ज्यांच्या ज्यांच्याकडून त्यांनी जबरीने पैसे लुबाडले होते त्यांना ते परत देऊ केले. दरम्यान ही घटना घडून देखील तक्रार देण्यासाठी कोणी पुढे न आले नाही, त्यामुळे या संशयिाताना चांगलाच फायदा झाला आणि या ठिकाणी आलेल्या पोलिसांनी तिघांना सोडून दिले. पोलीस प्रशासनातर्फे नुकतेच दि २४ रोजी जिल्ह्यातील नागरिकांनी सावधानतेचा इशारा देत अशा काही टोळी आपल्या आढळून आल्या तर त्यांना मारहाण न करता पोलीस स्थानकात तक्रार त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होईल. असे आवाहन देखील करण्यात येत आहे.





















