
जळगाव : प्रतिनिधी
दि २५ रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी महानगरच्यावतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुण अभिवादन करण्यात आले.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दिपक सूर्यवंशी, भाजपा सरचिटनीस महेश जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे,नगरसेवक विशाल त्रिपाठी, नगरसेवक महेश चौधरी, नगरसेवक राजु मराठे, राहुल वाघ, भाजपा युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आनंद सपकाळे, जयंत चव्हाण, आघाड़ी अध्यक्ष गजानन वंजारी, जब्बार शेख, भाजपा शहर कार्यालय मंत्री प्रकाशजी पंडित, भाजपा ग्रामीण कार्यालय मंत्री गणेश माळी यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी जळगाव शहराचे आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या कार्याची माहिती दिली.




















