
जळगाव : प्रतिनिधी
शहरात दुचाकी चोरीचे सत्र गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात सुरु झाले असून नुकतीच शहरातील एका नोकरीला असलेल्या महिलेची चारचाकी कार २४ रोजी चोरटयांनी लांबविली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील गंधर्व कॉलनीमधील एका अपार्टमेंट शेजारी लावलेली कार अज्ञात चोरट्यांनी २४ रोजी शनिवारी चोरून नेली. गंधर्व कॉलनीतील ज्ञानप्रभा अपार्टमेंटमधील वैष्णवी भरत पाटील (वय २१) यांनी त्यांची कार (क्रमांक एमएच-१९, डीजे-७१७४) ही शनिवारी संध्याकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरासमोरील प्रथमेश अपार्टमेंटच्या भिंतीजवळ पार्क केली होती. रविवारी सकाळी ११ वाजता त्या कामावर जाण्यासाठी कार घेण्यासाठी गेल्या असता कार जागेवर नव्हती. याप्रकरणी रविवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





















