
यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील मनवेल येथील एका २१ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना २८ रोजी दुपारी घडली आहे. या संदर्भात पोलीस पाटील यांनी खबर दिल्या वरून पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत जयदीप गुलाब पाटील (वय २१) मोलमजुरी करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
तरुणाने दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान आई, वडील व भाऊ ही सर्व मंडळी शेतात कामास गेले असता. आपल्या राहत्या घराच्या छताला असलेल्या लाकडी सऱ्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असुन,या तरुणा आत्महत्या का केली हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही. त्याच्या पश्चात आई, वडील, एक लहान भाऊ आहे. दगडी गावाचे पोलीस पाटील विठ्ठल गोरख कोळी यांनी खबर दिल्यावरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.




















