• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 29, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, प्रशासन
0
शहरी भागात स्मार्ट मीटर बसवावेत – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Share on FacebookShare on Twitter

जळगाव : प्रतिनिधी

महावितरणने आवश्यकतेनुसार सुरुवातीला शहरी भागातील ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवावेत आणि या कामात यशस्वी झाल्यानंतरच ग्रामीण भागातही स्मार्ट मीटर बसविण्यात यावेत. याशिवाय स्मार्ट मीटर हे चांगल्या कंपनीचे आणि उच्च दर्जाचे असावेत, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण व महानिर्मितीचे मुख्यालय असलेल्या मुंबई येथील प्रकाशगड येथे झालेल्या बैठकीत केल्या.
राज्याचे प्रधान सचिव (ऊर्जा) व महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे अनुक्रमे महापारेषण, महावितरण व महानिर्मिती कंपन्यांची माहिती सादर केली. या बैठकीस महावितरण, महापारेषण, महानिर्मिती आणि महाऊर्जा या कंपन्यांचे संचालक व म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरण सोबतच महानिर्मिती, महापारेषण आणि महाऊर्जा या चारही वीज कंपन्यांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी फडणवीस म्हणाले की, महावितरणने इतर कंपन्यांची थकीत देणी देण्यासाठी केंद्र शासनाला पत्र पाठवून त्याचा पाठपुरावा करावा. याशिवाय फोटो मीटर रीडिंगचे फोटो मानवी हस्तक्षेप टाळून थेट सर्व्हर प्रणालीमध्ये येण्यासाठी प्रयत्न करावेत. सौरऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असलेल्या गुंतवणूकदारांसोबत प्राधान्याने चर्चा कराव्यात. तसेच केंद्र सरकारने देशभरातील वीज वितरण कंपन्यांचे क्रमवारी जाहीर केली आहे, त्यात आपण कमी पडलो आहोत. या क्रमावारीत सुधारणेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन फडणवीस यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिका-यांना केले.
महानिर्मितीचा आढावा घेताना जुने सबक्रिटिकल संच टप्प्याटप्प्याने बंद करून तिथे नव्या अत्याधुनिक व पर्यावरणपूरक सुपर क्रिटिकल संचाची उभारणी गरजेनुसार व गतिमानतेने करण्याच्या सूचना देवेंद्र फडणवीस त्यांनी केल्या. चंद्रपूर येथील इराई जलाशयात प्रस्तावित तरंगत्या सौरऊर्जा प्रकल्पाच्या धर्तीवर मराठवाड्यातील जायकवाडी धरणातही तसा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची चाचपणी करण्यात यावी. खात्रीशीर वीजनिर्मितीसाठी व विशेषतः सर्वोच्च मागणीच्या काळात विजेची पूर्तता करण्यासाठी पंप स्टोअरेज जलप्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन त्यावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. वीज केंद्रांच्या कामगिरीत आणखी सुधारणा करून वीज केंद्रातील पर्यावरण व सुरक्षितता याबाबत दक्ष राहून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सर्व विभागातील प्रलंबित सौर प्रकल्पांना गती देणे, कोळसापुरवठा दर्जेदार होईल यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आणि कालपरत्वे जुन्या बंद केलेल्या वीज संचांच्या जागेचा विधायक उपयोग करून त्यायोगे मालमत्ता चलनीकरणाच्या प्रक्रियेतून महानिर्मितीला वाढीव उत्पन्नाचा स्रोत शोधण्यासाठी प्रयत्न करण्यावरही त्यांनी यावेळी विशेष भर दिला.

Related Posts

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !
जळगाव

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !
क्राईम

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले
क्राईम

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित
क्राईम

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026
धक्कादायक : जळगावातून अल्पवयीन दोन सख्या बहिणींना पळविले
क्राईम

रावेरमध्ये खळबळ : भररस्त्यात तरुणीला उचलून नेल्याची तक्रार; तिघांविरुद्ध गुन्हा !

October 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

जे.ई. स्कूलमध्ये संत मुक्ताई यांचा 747 वा जन्मोत्सव उत्साहात साजरा !

October 10, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group