
जळगाव : प्रतिनिधी
राज्यातील धोबी समाजाच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या राज्यस्तरीय डेबुजी युथ बिग्रेडच्या जिल्हा संपर्कप्रमुखपदी गणेश सपके यांनी एकमताने निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष राहुल वरणकार यांनी केली आहे. गणेश सपके हे जळगाव जिल्ह्यातील धोबी समाजाचे एक सामाजिक कार्यकर्ते असून त्यांच्यावर आज पावेतो संघटनेने विविध पदाची जबाबदारी दिली आहे, त्यांनी ती विश्वासाने पार पाडली असल्याने म्हणूनच आता त्यांना जिल्हा संपर्क प्रमुखपदी नेमणूक केल्याचे अध्यक्ष राहुल वरणकार यांनी दिली.
या निवडीबद्दल श्री.सपके यांच्यावर सामाजिक, राजकीय क्षेत्रातून अभिनदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी मनोज निंबाळकर, दीपक राऊत, हर्षल तीवाने, संदीप महाले, हर्षल ठाकरे, गिरीश शिरसाळे, विशाल निंबाळकर यांच्यासह समाज बधुनी कौतुक केले आहे.




















