
जळगाव : प्रतिनिधी
जायंटस ग्रुप ऑफ तेजस्विनी व नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑक्टोबर २०२२ रोजी स्वच्छतेचे प्रणेते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष मनिषा पाटील व अध्यक्ष ज्योती राणे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.सुरूवात स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन करून करण्यात आली. गांधीजींची उच्च विचारसरणी यावर मनिषा पाटील यांनी माहिती सांगितली. ज्योती राणे यांनी लाल बहादुर शास्त्री यांच्या जीवनकार्याविषयी सांगितले कार्यक्रमाचा समारोप रघुपती राघव राजाराम या सुंदर भजनाने झाला. याप्रसंगी नेहा जगताप, नूतन तासखेडकर , किमया पाटील मेहेजबिन अजमल शाह, गुलसबा अजमल शाह, डॉ मेराज नगावकर सौ माधुरी शिंपी च या उपस्थित होत्या. सूत्रसंचलन नेहा जगताप यांनी केले व आभार नूतन तास्खेडकर यांनी मानले.




















