• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्ह्यातील या आमदाराने केली बालकांना खरे सोने वाटप

देशाला परिवार समजून काम करणारे पंतप्रधान यांचा आदर्श नवीन पिढीने घ्यावा - आ. चव्हाण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 6, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
जिल्ह्यातील या आमदाराने केली बालकांना खरे सोने वाटप
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : प्रतिनिधी 

भारतीय जनता पक्षाच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत चाळीसगाव तालुक्याचे आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दि.१७ सप्टेंबर या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तावर चाळीसगाव शहर व तालुक्यात जन्माला आलेल्या २५ बालकांना प्रत्येकी १ ग्रॅम सोन्याच्या नाण्यांचे वाटप आज दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर करण्यात आले. मालेगाव रोड येथील शिवनेरी पार्क येथील नियोजित स्वामीनारायण मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या मंचावर मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासह भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, बजरंग दल तालुका प्रमुख अविनाश चौधरी, माजी मार्केट सभापती रविंद्र चुडामन पाटील, सरदारशेठ राजपूत, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, ओबीसी मोर्चा प्रदेश सरचिटणीस रमेश सोनवणे सर, नगरसेविका सौ. विजयाताई भिकन पवार, सौ.विजयाताई प्रकाश पवार, माजी नगरसेवक राजेंद्र गवळी, चिराग शेख, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, तालुका सरचिटणीस धनंजय मांडोळे, शहर सरचिटणीस अमोल नानकर, जितेंद्र वाघ, ओबीसी मोर्चा किशोर रणधीर, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ.रविंद्र मराठे, बबनदादा पवार, राकेश बोरसे सर, महेश शिंदे, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, योजनाताई पाटील व नवजात बालकांचे आई वडील, नातेवाईक उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार मंगेशदादा चव्हाण म्हणाले की, घरात नवीन सदस्याचे आगमन हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचा क्षण असतो मात्र ज्या पंतप्रधानांनी भारत हाच आपला परिवार मानून अहोरात्र मेहनत घेऊन भारताला बलशाली व सक्षम बनविण्याचा ध्यास घेतला आहे अश्या राष्ट्रनेत्याच्या वाढदिवसाच्या दिवशी बाळाचा जन्म होणे हेदेखील सुवर्णक्षणापेक्षा कमी नाही. म्हणून यादिवशी जन्माला येणाऱ्या बाळांना १ ग्रॅम सोन्याचे नाणे भेट देण्याचा निर्णय आम्ही घेतला. सोन्याचे नाणे हे केवळ प्रतिकात्मक असून त्यामागील प्रेम व जिव्हाळा महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदींजींनी बलशाली भारत बनविण्याच्या जो संकल्प घेतला आहे त्याला जर बळ द्यायचे असेल तर आपली भावी पिढी देखील त्याच विचारांची असली पाहिजे, नव्या पिढीपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा आदर्श डोळ्यापुढे ठेवावा असे प्रतिपादन यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी केले.

भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम व सरचिटणीस अमोल नानकर यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे कुठलेही उपक्रम असतील, काही संकल्पना असतील त्यासाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कायम पाठबळ संघटनेला मिळालेले आहे. मोदींजींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बाळांना १ ग्रॅम सोन्याचे नाणे द्यावे अशी चर्चा सुरू असतानाच मंगेशदादा चव्हाण यांनी त्याला पाठिंबा दिला व त्यादृष्टीने आम्ही नियोजन सुरू केले. जवळपास २५ बाळांना प्रत्येकी १ ग्रॅम ९९.९९ कॅरेट सोन्याचे नाणे आज वाटप केले जात आहे. या उपक्रमाची दखल संघटनेने घेतली असून राज्यात एकमेव चाळीसगाव तालुक्यात अश्या प्रकारचा उपक्रम आमदार मंगेशदादा चव्हाण व भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपन्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Posts

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !
जळगाव ग्रामीण

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !
क्राईम

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!
क्राईम

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ
जळगाव

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !
जळगाव

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर !

April 29, 2026
उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद
जळगाव

उन्हाच्या तीव्रतेमुळे सिग्नल बंद ठेवण्याची मनसेची मागणी; पोलिसांचा सकारात्मक प्रतिसाद

April 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

जळगावातील ‘रिंग रोड’ होणार हायटेक; महापौरांचे मंत्री महाजन यांना ४५ कोटींच्या विशेष अनुदानाचे पत्र !

April 29, 2026
डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

डीपी शॉर्टसर्किटने केळीच्या बागेला भीषण आग; मुक्ताईनगरात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान !

April 29, 2026
अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

अटलांटा घोटाळ्यावर मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश!

April 29, 2026
अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

अमृत भारत एक्सप्रेसचा भुसावळ व जळगाव येथे शुभारंभ

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group