
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील मुख्य बाजार पेठ असलेली नवीपेठ येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाजवळ गावठी पिस्तूल व कुकरी घेऊन फिरणाऱ्या संशयीत आरोपीला 5 ऑक्टोबर बुधवार रोजी दुपारी जळगाव शहर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. त्या संशयितावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी की, शहरातील नवीपेठ भागात बँक ट्रीट परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर संशयित आरोपी निखिल सुरेश पाटील (वय ३५) रा. खोटे नगर, जळगाव हा कमरेला गावठी पिस्तूल, कडतुस व कुकरी घेऊन दुचाकीने फिरत असल्याची गोपनीय माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ठाकुरवाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सूचना मिळाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, भास्कर ठाकरे पुना प्रफुल्ल धांडे, अमोल ठाकूर, रतन गीते, ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी दुपारी ३ वाजता कारवाईत करत संशयित आरोपी निखिल पाटील याला ताब्यात घेतले असून त्याच्यावरील गावठी पिस्तुल, कडतुस, कुकरी जप्त केली आहे. पुढील तपास पोलीस नाईक भास्कर ठाकरे करीत आहे.





















