
जळगाव मिरर / ९ ऑक्टोबर २०२२
तालुक्यातील नशिराबाद येथील सवतीला लागलेल्या औषधोपचारासाठी कर्जाची परतफेड करण्यासाठी पैशांची मागणी केल्याप्रकरणी सासरच्या मंडळीविरोधात नशिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील नशिराबाद येथील सासर असलेल्या विवाहिता आरती कृष्णा चौधरी(वय ३५) हिच्या मयत सवतीच्या औषधोपचारासाठी कर्जाची परतफेड करण्याकरिता विवाहितेकडून वेळोवेळी पैशांची मागणी करणाऱ्या संशयित आरोपी पती कृष्णा बळीराम चौधरी याच्यासह दोन मुलांवर विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन नशिराबाद पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेवा.युनुस शेख हे करीत आहेत.




















