
जळगाव मिरर / १० ऑक्टोबर २०२२
शहरातील निमखेडी परिसरात कोळी समाज बांधवानी मोठ्या आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील गिरणा नदी परिसरातील निमखेडी शिवारात कोळी समाज बांधवानी आद्य कवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला चंदूआणा नगर रिक्षा स्टॉप येथून प्रारंभ झाला होता. यावेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे आयोजन राज कोळी, प्रवीण कोळी, जितू कोळी, आकाश कोळी, मोहन कोळी, विशाल सोनवणे, सतीश कोळी, सचिन कोळी, दीपक कोळी, भूषण कोळी, गौरव कोळी, पंकज कोळी, विशाल कोळी, योगेश कोळी यांनी केले होते.




















