
जळगाव मिरर / ११ ऑक्टोबर २०२२
येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित, कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालयातील रसायनशास्र विभाग आणि सायकेम फार्मा लिमिटेड, धुळे यांच्यात दि.११ ऑक्टोबर, २०२२ रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारांतर्गत पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील रसायनशास्र विभागाच्या विद्यार्थ्यांना कौशल्य पूर्ण अभ्यासक्रमाच्या अध्ययनास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना केन्द्र शासनाच्या स्किल इंडिया च्या उपक्रमांतर्गत दरवर्षी सर्टिफिकेट कोर्सचे प्रशिक्षण कंपनीचे तज्ञ मार्गदर्शकांच्या मार्फत दिले जाणार असल्याने विद्यार्थ्यांना भविष्यात विविध कौशल्याभिमुख रोजगार संधी प्राप्त होणार आहेत. या सामंजस्य कराराप्रसंगी सायकेम फार्मा चे संस्थापक प्रा.डॉ.एस.एन.पटेल, डॉ.योगेश सातकर, चोपडा येथील कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.ए.सूर्यवंशी तसेच रसायनशास्र विभाग प्रमुख प्रा.एम.जी.पाटील, डॉ.एस.आर.पाटील, श्री.एम.ए.पाटील आदि उपस्थित होते.




















