
जळगाव मिरर / १४ ऑक्टोबर २०२२
चाळीसगाव तालुक्यातील धुळे महामार्गावरील भोरस फाट्याजवळ एकमेकांना कट मारण्याच्या नादात ट्रक व आयसर गाडीचा अपघात झाला. हा ट्रक कोबीने भरलेल्या रस्त्यात उलटा होत आडवा झाला. यामुळे गेल्या चार ते पाच तासांपासून वाहतुक पूर्णता; ठप्प झाली होती. घटनास्थळी पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्याचे काम सुरु आहे.
ट्रकमधील जखमी चालकास उपचारासाठी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. वाहतुक सुरुळीत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. जेसीबीने आल्यानतंर ट्रक रस्त्यावरुन बाजूला करण्यात आला असून आता वाहतुक सुरुळीत झाली आहे. मदत कार्यासाठी महमार्ग पोलिसांनी वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखील पोउपनि.भागवत पाटील, एपीआय रूपाली पाटील, एएसआय प्रताप पाटील, पोकॉ. सुनील पाटील ,अशोक चौधरी,पो.हा. योगेश बेलदार, विरेंद्रसिंग सिसोदे,पो.ना. जोशी, वसीम शेख पो.कॉ.धनंजय सोनवणे ईशांत तडवी, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे प्रवीण सगिले आदिनी घटनास्थळी उपस्थित राहुन वाहतुक सुरुळीत केली.




















