जळगाव मिरर । १ फेब्रुवारी २०२३।
देशाच्या संसद भवनात अर्थसंकल्प मांडताना आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गरीबांसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा केली. त्या म्हणाल्या, आता देशातील कुणीही व्यक्ती भूकेने व्याकुळ राहून रात्र काढणार नाही. १ जानेवारी २०२४ पर्यंत आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मोफत रेशन दिले जाईल. जेणेकरून या लोकांना पुरेसं अन्न मिळेल. देशात कुणीही उपाशी राहणार नाही. देशातील प्रत्येक टप्प्यावरील जनतेची काळजी या अर्थसंकल्पात घेण्यात येईल, असं आश्वासन निर्मला सीतारमण यांनी दिलंय. त्यानुसार त्यांनी मोफत रेशनच्या योजनेची घोषणा केली.
केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 2 लाख कोटी रुपये खर्च केले.. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प मांडताना ही माहिती दिली.
– डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शेतीला प्रोत्साहन देणार – फळबाग योजनांसाठी 2200 कोटी रुपयांची तरतूद – कमकुवत शेतकऱ्यांसाठी सहाकार मॉडेल – ग्रीन ग्रोथला प्राधान्य देणार – भरड धान्य उत्पादनाला प्रोत्साहन देणार – मिशन मोडवर पर्यटनाला प्रोत्साहन देणार – देशात 157नवे नर्सिंग कॉलेज स्थापन करणार – बालक आणि तरुणांसाठी डिजिटल लायब्ररी उभारणार – नॅशनल आणि डिजिटल लायब्ररी पंचायत आणि वॉर्ड लेव्हलपर्यंत उघडणार – प्रादेशिक आणि इंग्रजी भाषेत पुस्तकं मिळणार – विविध राज्यांना वाचनालय उभारण्यासाठी प्रोत्साहित करणार – रेल्वेसाठी 2.4 लाख कोटी रुपयांची तरतूद – रेल्वे विभागात आगामी वर्षात 75000 नवी भरती करणार – देशात नवे 50 एअरपोर्ट आणि हेलिपॅड उभारणार