जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२४
आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना राज्यातील अनेक जिल्ह्यात आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर नुकतेच जामनेर मतदार संघाचे आमदार व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याच मतदार संघातील भाजपच्या नेते तथा माजी जि.प.सदस्य दिलीप बळीराम खोडपे यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून आगामी काळात ते निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी आज आपल्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून तेच गिरीश महाजन यांना आव्हान देतील अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप खोडपे हे शरद पवार गटात सहभागी होऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. यामुळे गिरीश महाजन यांच्या समोर विधानसभा निवडणुकीत मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.
माजी जि.प.सदस्य दिलीप खोडपे यांनी दिलेला राजीनामा पत्र