जळगाव मिरर | १ एप्रिल २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नेहमीच अपघाताच्या घटना घडत असताना आज दि. १ एप्रिल रोजी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली असून या घटनेत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत काही जणांना किरकोळ जखम झाल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर येथे आमदार चंद्रकांत पाटील लग्नानिमित्त जात असताना कुंड गावाजवळ जुने कुंड रस्त्यावर त्यांच्या ताफ्यातील पोलिसांची गाडी क्रमांक MH19EA6018 ही समोरील वाहनावर (MH19DV0005) आदळल्याने हा अपघात झाला. या अपघातात ताफ्यातील पोलीस कर्मचारी एएसआय काझी, पो.कॉ. तोसिफ शेख, पो.कॉ.जवाहर पवार, गाडी चालक शब्बीर शेख यांना किरकोळ ईजा झाली आहे. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांना सुध्दा किरकोळ ईजा झाल्याने ते उपचारासाठी जळगाव येथे रवाना झाले.