जळगाव मिरर / २९ एप्रिल २०२३ ।
जिल्ह्यातील बाजार समित्यांची मतमोजणी सुरु झालेली असून अनेक ठिकाणचे निकाल आता हाती येत आहे. भुसावळात भाजपचे संजय सावकारे यांनी थेट आ.खडसे यांना धक्का दिल्यानंतर दुसरी बातमी पारोळ्यातून समोर या निवडणुकीत शिंदे गटाचे आ.चिमणराव पाटील यांना महाविकास आघाडीने होमग्राऊडवरच पराभव केला आहे.
पारोळा बाजार समितीत शिंदे गटाचे आ.चिमणराव पाटील व राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्यासोबत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्यात जोरदार लढत झाली आहे. पण मतमोजणीच्या सुरुवातीपासून १५ जागेवर महाविकास आघाडीच आघाडीवर आहे. त्यानंतर महाविकास आघाडीच्या १५ जागेवर आघाडीवर आहे तर आ.चिमणराव पाटील यांचे सुपुत्र व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांना अवघ्या तीन जागेवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे अमोल पाटील यांना देखील पराभवाचा मोठा धक्का बसला आहे.