जळगाव मिरर | ९ ऑगस्ट २०२४
घरगुती वादातून दारूच्या नशेत असलेल्या पतीने पत्नीला मारहाण करून दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार केले. ही घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास गणेश कॉलनी येथे घडली. याप्रकरणी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी परिसरात शितल संजय साळुंखे (वय ४०) या महिला आपल्या पती संजय यशवंतराव साळुंखे (वय ५२) यांच्यासोबत वास्तव्याला आहे. बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पतीपत्नीमध्ये घरगुती वाद निर्माण झाला. त्यानंतर पती संजय साळुंखे हा दारूच्या नशेत असतांना त्यांची पत्नी शितल साळुंखे यांना मारहाण करून त्यांच्या दोन्ही हातांवर धारदार ब्लेडने वार करून गंभीर दुखापत केली. दरम्यान महिलेने दुपारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन पती विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार संजय यशवंतराव साळुंखे यांच्या विरोधात सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात – गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस कॉन्स्टेबल भारती देशमुख या करीत आहे.